मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेला चांगला प्रतिसाद मिळेल : गृह राज्यमंत्री देसाई

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेला चांगला प्रतिसाद मिळेल : गृह राज्यमंत्री देसाई
Updated on

सातारा : ग्रामपंचायत निवडणुका गावातील स्थानिक प्रश्‍नावर लढविल्या जातात. शिवसेनेची पक्ष संघटना बांधणी चांगल्या पद्धतीने झाली असून, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेला जिल्ह्यात चांगले वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीतजास्त ग्रामपंचायती निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी ठरविल्यास महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुका लढविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भगवते साई मंगल कार्यालयात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यानंतर मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील जास्तीतजास्त ग्रामपंचायती निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. यासाठी माझ्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते प्रा. बानुगडे पाटील, आमदार महेश शिंदे, सदाशिव सपकाळ, धैर्यशील कदम, शेखर गोरे यांनी एकत्रित बैठका घेऊन ग्रामपंचायत निवडणुकांचे नियोजन केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगल्या पद्धतीने यश येईल, असा विश्‍वास व्यक्त करून मंत्री देसाई म्हणाले, "जिल्ह्यात शिवसेनेची चांगल्या पद्धतीने बांधणी केली असून, सभासद नोंदणीतही आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळेल. मात्र, तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी ठरविल्यास महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुका लढविल्या जातील.'' 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी स्थानिक शिवसैनिक खंबीर आहेत. त्यासाठी नेत्यांनी प्रचारात सहभागी होण्याची गरज नाही; पण एखाद्या ग्रामपंचायतीसाठी कार्यकर्त्यांनी मागणी केल्यास पक्षाचे पदाधिकारी प्रचारात सहभागी होतील, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. कोरेगाव तालुक्‍यातील वॉर्ड रचनेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करून कमी मतदान असलेले वॉर्ड करण्याचा प्रकार झाला आहे, यासंदर्भात आमदार महेश शिंदे म्हणाले, "कोरेगाव तालुक्‍यातील काही ग्रामपंचायतींची वॉर्ड रचना करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कमी लोकसंख्येचे वॉर्ड बनविण्यात आले आहेत. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.'' 

ते त्यांचे वैयक्तिक मत 

खासदार उदयनराजेंसह काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर तुमचे मत काय, या प्रश्‍नावर मंत्री देसाई यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com