खुनांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची रात्रगस्त वाढविणार : गृहराज्यमंत्री देसाई

खुनांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची रात्रगस्त वाढविणार : गृहराज्यमंत्री देसाई
Updated on

सातारा : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांत वाढलेले खुनाचे प्रकार लक्षात घेता पोलिसांची रात्रगस्त वाढविण्याची सूचना आम्ही पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. खुनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता या गुंड प्रवृत्तींना कोणी राजकीय व्यक्ती पाठीशी घालतेय का, याचा तपास पोलिस करत असून तसे होत असेल तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. 

जिल्ह्यात वाढत्या खुनाच्या घटना घडल्या असून गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही पोलिसांना काही सूचना केल्या आहेत का, या प्रश्‍नावर मंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात मागील चार पाच दिवसात पाच खुनांच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनांत आरोपींना राजकीय लोकांचे पाठबळ मिळतेय का, त्यांचे काही लागेबांधे आहेत का, याची माहिती पोलिस घेत आहेत. पाच ही खुनांतील संशयित आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना कठोर शासन होईल, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करणार आहे. गुंड प्रवृत्तींना कोणी पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर ही कारवाई होईल. जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी रात्रगस्त वाढविण्यात येणार असून रात्र गस्तीचा कालावधी व राऊंडही वाढविले जातील. पाच ही खुनांच्या बाबतीतील तपासणी अहवाल पोलिस अधीक्षकांकडून मागविला आहे. त्यामुळे आगामी काळात खूनाच्या घटना घडू नयेत, यासाठीची पावले पोलिसांकडून उचलली जातील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

पक्ष प्रमुखांचा आदेश आल्यास तयारी.... 
सहपालकमंत्री पदासाठी तुमच्या नावाची चर्चा असून याबाबत स्थानिक जनतेतून मागणी होऊ लागली आहे. या प्रश्‍नावर मंत्री देसाई म्हणाले, मुळात तो धोरणात्मक निर्णय आहे. त्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यांच्या अधिकारात मी हस्तक्षेप करू शकत नाही. पण पक्ष प्रमुख व पक्ष जो आदेश देईल, त्याप्रमाणे शंभर टक्के काम करण्यास मी तयार आहे, असे सांगताना सहपालकमंत्री होण्याबाबतची अप्रत्यक्ष इच्छा त्यांनी बोलून दाखविली. 

आमदारकीच्या यादीत नाव हेच भाग्य... 
आमदारकीच्या यादीत नाव आल्यापासून आक्रमक असलेले प्रा. नितीन बानुगडे पाटील शांत झाले आहेत, याचे कारण विचारले असता प्रा. बानुगडे पाटील म्हणाले, पक्षाकडून दिलेल्या जबाबदारीनुसार मी पक्ष संघटना बांधणीचे काम सातत्याने व शांत राहून कुठेही प्रकाशात न येता करत आहे. पक्ष पुढे नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता राज्यपाल त्यांचा निर्णय ते घेतील. पण पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीच्या यादीत नाव घालण्याइतके मला पात्र समजले हेच माझे मी भाग्य समजतो, असेही श्री. बानुगडे पाटील यांनी नमूद केले. तर राज्यपाल मंत्री मंडळाची शिफारस लवकरच मान्य करतील व सर आमदारकीची शपथ घेतील, असा विश्‍वास शंभूराज देसाईंनी व्यक्त केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shocking Incident in Wai; Woman Student Found Dead in Dhom Canal
Satara Gears Up for Legislative Council Battle; BJP Eyes Strong Candidates
Kolhapur Board Receives Proposal to Cancel Recognition of Panchgani’s Pinewood School
Maratha Heritage Comes Alive as Satara Museum Adds New Galleries on Shivaji Era
Marathi News Esakal
www.esakal.com