esakal | Corona Virus शनिवार आणि रविवारीच बाहेर येतो का?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मी मेडिकलचा स्टुडंट नाही, पण एक कॉमन सेन्स मलाही आहे. मी सायन्स शिकलेलो आहे. वयाची मर्यादा कमी केली, तर कामगारांनाही लस देता येईल, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Corona Virus शनिवार आणि रविवारीच बाहेर येतो का?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल
sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झालं असतं, तरीही मी दुकान उघडं ठेवलं असतं. लॉकडाऊनमुळे माझ्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही. शनिवार, रविवारी बंद ठेवताय कशाकरिता कोरोनाचा व्हायरस शनिवार रविवारच बाहेर येतो का?, असा सवाल साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित करून शनिवार, रविवारच्या लॉकडाउनची खिल्ली उडवली.

मिनी लॉकडाउनच्या विरोधात काल व्यापाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस माजी सभापती सुनील काटकर, सुशांत निंबाळकर, राजेंद्र यादव यांच्यासह सातारा व कराडातील व्यापारी उपस्थित होते. बैठकीनंतर उदयनराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी उदयनराजे म्हणाले, शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध घालून दिले आहेत, हे बोलणे सोपं आहे. सध्या वातावरणात दोन मिलियनपेक्षा जास्त व्हायरस आहेत. आता कोरोना असला तरी प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढविली पाहिजे. मास्क घातला तरी संसर्ग होऊ शकतो. लोकांनी पहिल्यावेळी ऐकले. आता लोकांची प्रशासनाचे ऐकण्याची मानसिकता राहिलेली नाही. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे, सणासुदीचे दिवस असून कर्ज काढून व्यापाऱ्यांनी माल भरला आहे. उद्या बॅंका त्यांच्या हप्ते भरण्यासाठी मागे लागणार आहेत. त्यामुळे दुकानातील कामगारांच्या लसीकरणासाठी वयाची अट शिथिल करावी. हा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. 

सातारकरांनो, काळजी घ्यावीच लागेल! ‘Oxygen Bed’ शिल्लकच नाहीत; जाणून घ्या बेडची संख्या..

मी मेडिकलचा स्टुडंट नाही, पण एक कॉमन सेन्स मलाही आहे. मी सायन्स शिकलेलो आहे. वयाची मर्यादा कमी केली तर कामगारांनाही लस देता येईल. कामगारांना लस दिली तरी देखील दुकाने उघण्यास परवानगी दिली जात नाही, मग कोण ऐकणार. मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झाले असतं तरी मी दुकान उघडं ठेवले असते. लॉकडाऊनमुळे माझ्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही. शनिवार, रविवारी बंद ठेवताय कशाकरिता कोरोनाचा व्हायरस शनिवार-रविवारच बाहेर येतो का, असा सवाल त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे.

फोटो काढून फेसबुकवर मिरवण्याशिवाय नगराध्यक्षांनी काहीच काम केलेले नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत नियमांचे उल्लंघन नको; पोलिस उपअधीक्षकांचे जनतेला आवाहन

Corona Virus : बॅंडबाजा बारात, बॅंडचालक अद्याप घरात; कलाकारांना पुन्हा संसर्गझळा

संपादन : बाळकृष्ण मधाळे