फलटण तालुक्‍यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-भाजपात कांटे की टक्कर

फलटण तालुक्‍यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-भाजपात कांटे की टक्कर

कोळकी (ता. सातारा) : फलटण तालुक्‍यामधील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोळकीतील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी व भाजपमध्ये सरळ सरळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

एकूण सहा वॉर्डांतर्गत 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 94 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यापैकी एक अर्ज बाद झाला आहे. फलटण शहराला लागूनच असलेले हे गाव म्हणजे फलटण शहराचे उपनगरच झाले आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. राजकीय व आर्थिकदृष्ट्या या ग्रामपंचायतीचे महत्त्व मोठे आहे. 

पक्षाची उमेदवारी न मिळालेले अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. नाराज गट स्वतंत्र लढणार आहे. भष्टाचार, तसेच विकासकामे झाली नसल्याने या वेळच्या निवडणुकीमध्ये कोळकी ग्रामपंचायतीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकवणारच, असा निर्धार जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सर्व उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. स्वतःची व पक्षाची प्रतिष्ठा राखण्याकरिता नेतेमंडळी आपापली संपूर्ण ताकद लावणार असल्याचे दिसत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com