जाहिरातबाजीमुळे पुसेगावची बाजारपेठ विद्रूप; अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाईची गरज

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव ग्रामपंचायत हद्दीतील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सचे पेव फुटले आहे. संबंधित जाहिरातींमुळे बाजारपेठेतील दुकाने झाकली जाणे, रस्त्यावरून चालण्यास अडचण होणे, वाहतुकीस अडथळा होणे असे अनेक प्रकार घडत आहेत. 

परिणामी, व्यावसायिक, तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारे बाजारपेठेचे विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती किंवा त्याचा हस्तक यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची गरज दिसून येत आहे. पुसेगाव येथील शिवाजी चौकात अनेकदा रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचे फ्लेक्‍स आणि होर्डिंग्ज लावलेली असतात. 

अनेक होर्डिंग्ज व फ्लेक्‍सबाजी वाहनचालकांचे लक्ष वेधते. यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढत आहे. गावात बहुतेक ठिकाणी होर्डिंग्ज आणि फ्लेक्‍स हे रस्त्याच्या हद्दीतच झळकत असतात. या भागातून 24 तास औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक, तसेच अन्य वाहतूक सुरू असते. यामुळे, बेकायदा टोलेजंग फ्लेक्‍स कोसळून अपघाताची शक्‍यता वाढली आहे. परिणामी, वाढत्या जाहिरातबाजीमुळेही पुसेगाव बाजारपेठ विद्रूप होत असून, त्यावर संबंधित विभागाने नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com