नववर्षाच्या पूर्वसंध्येला कऱ्हाडात 100 वाहनांवर पोलिसांची कारवाई

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कऱ्हाडात 100 वाहनांवर पोलिसांची कारवाई
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहराच्या हद्दीतील महामार्गावर अवजड वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांसह हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर थेट कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक शाखेने दिवसभरात तब्बल 100 वाहनांवर कारवाई केली. त्याव्दारे 32 हजारांचा दंडही वसूल केला. त्यामुळे अवजड वाहनांसह दुचाकीस्वार पोलिसांच्या रडारवर होते. 

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामध्ये विना हेल्मट दुचाकी चालवणाऱ्यांसह मद्यपी दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. मोठ्या अवजड वाहनांवरही कारवाई झाली. मोठ्या वाहनात प्रमाणापेक्षा जास्त साहित्य दिसल्यास त्यांच्यावर थेट दंड आकारण्यात आला. काही वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मद्यपी वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई झाली. वाहतूक शोखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. त्यात सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 

पाचवड फाटा, कोयना वसाहत फाटा, कोल्हापूर नाका, वारूंजी फाट्यासह खोडशी परिसरात वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. त्यामध्ये अवजड साहित्य घेऊन येणारा ट्रक किंवा लॉरी पकडली जात होती. दिवसभरात अशा तब्बल 60 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 12 हजारांचा दंडही वसूल केला. त्यासह कोल्हापूर नाका, कृष्णा कॅनॉल चौक, विद्यानगर, कार्वे नाका, पाचवड फाटा या परिसरात स्वतंत्र पथकाव्दारे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकींवर कारवाई केली. त्यातही 40 दुचाकीधारकांकडून तब्बल 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये शहरातील सर्व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com