
कुळकजाई ही पश्चिम माणमधील समूह ग्रामपंचायत आहे. त्यात कुळकजाई, कळसकरवाडी, गाडेवाडी व खोकडे यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या नऊ आहे. कुळकजाईतून पाच, कळसकरवाडीतून 2, तर गाडेवाडी व खोकडेतून प्रत्येकी एक सदस्य निवडला जातो. 2010 साली ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती.
दहिवडी (जि. सातारा) : कुळकजाई (ता. माण) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इच्छुकांनी बाह्या सरसावल्या आहेत. गटातटांसह अपक्ष मैदानात उतरल्यामुळे राजकीय संघर्ष उफाळणार आहे.
कुळकजाई ही पश्चिम माणमधील समूह ग्रामपंचायत आहे. त्यात कुळकजाई, कळसकरवाडी, गाडेवाडी व खोकडे यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या नऊ आहे. कुळकजाईतून पाच, कळसकरवाडीतून 2, तर गाडेवाडी व खोकडेतून प्रत्येकी एक सदस्य निवडला जातो. 2010 साली ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. तर 2015 साली राष्ट्रवादी विरुध्द कॉंग्रेस अशी चुरशीची निवडणूक झाली होती. शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीचे, तर आमदार जयकुमार गोरे यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व केले होते. स्थानिक पातळीवर रमेश शिंदे, कुमार पोतेकर, किसनराव शेडगे, आप्पासाहेब बुधावले, अमर कुलकर्णी, बशीर मुलाणी आदी नेतेमंडळींनी आपल्या गटातटांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यावेळी विजयी व पराभूत उमेदवारांतील फरक फक्त एक आकडी मतांचा होता. अगदी निसटता विजय राष्ट्रवादीच्या पारड्यात पडला होता.
दलित महासंघाचे कऱ्हाडला आंदोलन; मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाची मागणी
पाच विरुद्ध चारने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली होती. यावेळी सर्व ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर तरुणांना संधी देऊन यंदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पावले उचलली होती. पण, बिनविरोध संधी मिळतेय तर मला का नको? असा पवित्रा बहुतेक तरुणांनी घेतला. त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांवर पाणी पडले. नऊ जागांसाठी 47 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन पॅनेल तसेच अपक्ष अशी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत.
कऱ्हाडला 30 मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे; हेल्मेट नसणाऱ्या 200 जणांवर कारवाई
ज्येष्ठांकडून प्रयत्न सुरूच
निवडणूक लढविण्यासाठी तरुण सरसावले असले तरी ज्येष्ठ मंडळींनी अजून प्रयत्न सोडले नाहीत. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत तरुणांना समजावून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनधरणी सुरू ठेवली आहे. ज्येष्ठांच्या प्रयत्नांना यश येणार की तरुण आपला हेका कायम ठेवणार, हे चार जानेवारीला समजेल. तोपर्यंत पडद्याआडून बऱ्याच हालचाली घडणार आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे