'तू कर हसल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं'; तब्बल 65 वर्षांपासून कोयना अभयारण्यग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on: 

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न 65 वर्षांपासून प्रलंबितच आहेत. त्यात आता कोयना अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांची भर पडली आहे. एक दशकापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 111 अभयारण्यग्रस्त बाधितांच्या तोंडाला वन्यजीव विभाग व महसूल विभागाने पाने पुसली आहेत. पात्र असूनही त्यांना अपात्र राहावे लागत असल्याने बाधितांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न बाधितांकडून विचारला जात आहे. यामुळे कोयना बाधितांच्या पुनर्वसन नावाच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शासन व प्रशासनाकडून अजून सुरूच असल्याचे अधोरेखित होत आहे. यावरती चर्चा झाली असली, तरी न्याय कधी मिळणार हा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नुकतीच याबाबत बैठक झाली असली, तरी अनेक प्रश्न या बैठकीत प्रलंबित ठेवले गेले असल्याचे समजते, त्यामुळे धरणग्रस्तांना आणखी काही कालावधीची वाट पहावी लागणार आहे.
 
कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न 65 वर्षांपासून मृगजळच ठरले आहेत. आजपर्यंत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. ही भळभळणारी जखम भरली नसताना त्यात अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांची भर पडली आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाची निर्मिती पाच जानेवारी 2010 रोजी झाली आहे. प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये समाविष्ट असणाऱ्या धरण अंतर्गत असणाऱ्या गावांचे स्थलांतर झाले असले, तरी या गावांतील भूमिहीन असणाऱ्या 111 बाधित न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. महसूल विभागाबरोबर वन्यजीव विभागाने या बाधितांना बेदखल केले आहे.

पाटण तालुक्‍यात वणव्यांचा भडका; नैसर्गिक वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती
 
वन्यजीव विभागाने या पात्र भूमिहीन बाधितांची यादी केली आहे. ही यादी प्रांताधिकारी पाटण यांनी मान्य केली असली, तरी ही यादी शोपीस ठरली आहे. महसूल विभाग दर वर्षी यादी बाहेर काढत असली, तरी कार्यवाही करत नाही, तर वन्यजीव विभाग मात्र महसूल विभागाने कार्यवाही केल्यावर आम्ही अंमलबजावणी करणार असल्याचे सांगत आहे. या दोन्ही विभागांची कृती "तू कर हसल्यासारखे, तर मी करतो रडल्यासारखे' असल्याने 111 बाधित मेटाकुटीला आले आहेत. 

कोयना धरणात जलसमर्पणाचा इशारा 

वन्यजीव व महसूल विभागामध्ये ताळमेळ नसल्याने पात्र असणाऱ्या या बाधितांना अपात्र राहावे लागत असल्याने या पात्र बाधितांनी कोयना धरणात जलसमर्पण करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com