वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब! कऱ्हाडात एअर कंडिशनर पीपीई किटचे संशोधन

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

मलकापूर (जि. सातारा) : कऱ्हाड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून व संशोधनातून एअर कंडिशनर सुविधेचा अंतर्भाव असलेल्या पीपीई किटचे संशोधन करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याची माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डी. के. अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पीपीई किटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या या उपकरणाच्या संशोधन आणि विकासासाठी कृष्णा विद्यापीठाचे डॉ. अग्रवाल, डॉ. विठ्ठल धूळखेड, डॉ. अर्चना गौतम, कऱ्हाड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमाकांत श्रीवास्तव, डॉ. सुहास देशमुख, संशोधक विद्यार्थी चारूदत जगताप, अक्षय गावडे व निखिल भिसे यांनी प्रयत्न केले. श्री. अग्रवाल म्हणाले, "कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी सातत्याने समाजोपयोगी संशोधनाला चालना दिली आहे.'' 

घनदाट जंगलात तीन दिवस भरणारी पानेरीची वाल्मीकी यात्रा रद्द

डॉ. धूळखेड, डॉ. गौतम, डॉ. श्रीवास्तव, डॉ. देशमुख म्हणाले, "संशोधित पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहणार आहे. कीट परिधान करणाऱ्या डॉक्‍टरांच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होणार आहे. या उपकरणात 0.1 मायक्रॉन आकाराचा हेपा फिल्टर बसविण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणू हा यापेक्षा मोठ्या आकाराचा असल्याने त्याचा शिरकाव या उपकरणाद्वारे पीपीई किटमध्ये होऊ शकत नाही.''  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com