काशी विश्वेश्वर मंदिरात वृध्दाचा असाही प्रामाणिकपणा; सापडलेले पैसे केले पोलिसांना परत

काशी विश्वेश्वर मंदिरात वृध्दाचा असाही प्रामाणिकपणा; सापडलेले पैसे केले पोलिसांना परत
Updated on

सातारा : काशी विश्वेश्वर मंदिराचे पुजारी विश्वास दत्तात्रय भोईटे (वय ६०, रा. शुक्रवार पेठ) हे शनिवारी मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील ५३०० रुपये पडले. 

हे पैसे त्या ठिकाणी गेलेले भाविक काशिनाथ गणेश देवरुखकर (वय ८५, रा. व्यंकटपुरा पेठ) यांना सापडल्यानंतर त्यांनी ते शाहूपुरी पोलिस ठाण्यात जमा केले. शाहूपुरी पोलिसांनी त्याची सर्व माहिती घेवून ते पैसे पुजाऱ्याचे असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे परत दिले. दरम्यान, वृद्धाने प्रामाणिकपणे पैसे परत केल्याने त्याबाबत नागरिकांनी व पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. सध्याच्या धावपळीच्या जगात माणुसकी शिल्लक नसल्याचे वेळोवेळी अनुभवास येते. त्याची प्रचितीही वारंवार पहायला मिळते. मात्र, एका वृद्धाने प्रामाणिकपणे पैसे परत केल्याने जगात कुठेतरी माणुसकी शिल्लक असल्याचे दिसत आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kas Lake overflow today
Koyna Dam storage report today
Landslide Risk Looms in Patan; Authorities Step Up Safety and Relocation Efforts
Koyna Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com