esakal | होम आयसोलेशन रद्द; 'पीएचसी'त 100 बेडचा विलगीकरण कक्ष करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Singh

होम आयसोलेशन रद्द; 'पीएचसी'त 100 बेडचा विलगीकरण कक्ष करा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : होम आयसोलेशनमधील (home isolation) बाधित रुग्णही (covid19 positive patient) बाहेर फिरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचा विचार करता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (primary health center) ठिकाणी 100 बेडचा, तर गावामध्ये किमान 30 बेडचा विलगीकरण कक्ष (isolation center) तातडीने सुरू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar singh) यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या. (satara-news-shekhar-singh-orders-to-prepare-100-beds-isolation-center-primary-health-center-karad)

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना, कडक लॉकडाउनची अंमलबाजवणी, लसीकरण आदींच्या आढावा जिल्हाधिकारी सिंह यांनी येथील तहसील कार्यालयातून घेतला. त्या वेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा: भगवान बुद्धांना 'अशी' झाली ज्ञानप्राप्‍ती; ज्याने बदला संपूर्ण इतिहास!

जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत झालेले लसीकरण, लॉकडाउनची अंमलबजावणी याची सर्व प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकणी 100 बेडचे, तर गाव पातळीवर 30 बेडचा विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याच्या सूचना सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या. लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.

ब्लाॅग वाचा