उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही परिस्थिती जैसे थे

त्यामुळे त्या युवकाचा जीव टांगणीला लागला आहे.
injection
injectiongoogle
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : गोटे (gote) येथील एका युवकाला म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्याला त्रास सुरू झाला असून, तो अत्यवस्थ आहे. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात (krishna hospital) उपचार सुरू आहेत. हे इंजेक्‍शन मिळावे यासाठी जिल्हा रुग्णालयात कृष्णा रुग्णालयातून पत्रव्यहार करण्यात आला आहे. मात्र, चार दिवसांनंतरही इंजेक्‍शन मिळत नसल्याने रुग्णाच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (satara-news-shortage-mucormycosis-injection-ajit-pawar-karad)

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असतानाच म्युकरमायकोसिसचाही प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा कऱ्हाड तालुक्‍यातील पहिला रुग्ण गोटे गावात सापडला आहे. गोटेतील एका 31 वर्षीय युवकाला त्याचा त्रास झाला आहे. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला असून, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्याच्यावर उपचारासाठी त्याला ऍम्फोटेरिसिन बी या इंजेक्‍शनाची गरज आहे. ते सातारा जिल्ह्यातील फक्त शासकीय हॉस्पिटललाच मिळते. खासगी मेडिकलमध्ये ते उपलब्ध नाही. ते इंजेक्‍शन मिळावे, यासाठी कृष्णा हॉस्पिटलने सातारा शासकीय रुग्णालयाला 26 मे रोजी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ते इंजेक्‍शन अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे त्या युवकाचा जीव टांगणीला लागला आहे.

injection
मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर आम्ही ठाम; लवकरच निर्णय : अजित पवार

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठीचे इंजेक्‍शन मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा शहरात शुक्रवारी झालेल्या बैठकीत विषय झाला, तरीही इंजेक्‍शन मिळत नाही. हे गंभीर असून, रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता आहे अशी भावना कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti warning to sugar factories
Krishna Sugar Factory Karad
High Court Decision on Anil Desai and Rajendra Rajpure Election Eligibility Creates Legal Uncertainty for Seven Other Directors
Sonal Sonawane Success Story From Losing Her Husband to Building a Future for Two Children Through Courage and Determination
Marathi News Esakal
www.esakal.com