बेरोजगारांना संधी! साता-यात सलग सहा दिवस रोजगार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे.

सातारा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे ता. 29 ऑक्‍टोबर व तीन नोव्हेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे. 

या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर, पदवीधर उमेदवारांकरिता संधी आहे. काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या (02162) 239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या मेळाव्याचा बेरोजगारांना लाभ होणार असून त्यांची आर्थिक परिस्थिती बरोबर कौटुंबिक देखील सुधारणार आहे. त्यामुळे वेळीच या संधीचा लाभ घेऊन आपले भवितव्य उज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले आहे. 

शाहूपुरी पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Six Days Job Fair At Satara