
सातारा : शहराच्या इतर भागातील भुयारी गटारे सांडपाणी वाहून नेण्याचे काम सक्षमपणे करत असली तरी गोलबागेसह राजवाडा बसस्थानक परिसरात अशी गटारे नागरिकांसह व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे याठिकाणी भुयारी गटाराच्या कामात कमी व्यासाच्या पाइपा टाकण्यात आल्याने त्याठिकाणी सांडपाण्याची दररोज तुंबातुंबी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.