Gram Panchayat Election : जिल्हा क्रीडा संकुल चार दिवस बंद : क्रीडाधिकारी नाईक

प्रशांत घाडगे
Wednesday, 13 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामकाजासाठी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व क्रीडा सुविधा उद्यापासून चार दिवस बंद राहणार आहेत.

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामकाजासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व क्रीडा सुविधा उद्यापासून (ता. 14) ते 18 जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली. 

शहरातील खेळाडू, नागरिक विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण व व्यायाम करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात सकाळ-सायंकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने येतात. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे.

शासकीय कार्यालयांतील खासगीकरण रद्द करा; चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे 27 रोजी आंदोलन

ता. 15 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर सर्व व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन संकुलातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात येणार आहेत. 18 जानेवारीला निकालाची प्रक्रिया सकाळपासून सुरू होणार असल्याने संकुलातील सर्व क्रीडा सुविधा बंद राहतील. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Sports Complex In Satara Closed For Four Days Due To Gram Panchayat Election