esakal | महू धरणाच्या वळणावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर; 20 प्रवासी बचावले

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News, Satara News}

महू धरणाजवळ वळणावर एसटी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

satara
महू धरणाच्या वळणावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर; 20 प्रवासी बचावले
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महू धरणाजवळ वळणावर एसटी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. धरणाच्या बाजूला कठड्यावर बस गेल्याने प्रवासी बचावले. 

हा अपघात रविवारी सायंकाळी सहा वाजता झाला. पाचवड-पाचगणी बस पाचगणीकडे जात होती. महू धरणावर वळणावर पाचगणीहून येणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिली. बस चालकाने प्रसंगावधान राखून दुचाकीला वाचवताना गाडी धरणाच्या बाजूला कठड्यावर धडकावली. त्यातील एक कठडा तुटून खाली पडला. 

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार तर ६ जण जखमी

परंतु, दुसऱ्या कठड्याने गाडी तारून ठेवली, अन्यथा अनर्थ घडला असता. या बसमध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यातील कुणालाही दुखापत झाली नाही. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ग्रामस्थांनी त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले आहे. महू व दापवडीचे पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे