फलटणात नुकसान भरपाईच्या बोगस याद्या; 'स्वाभिमानी'चा प्रशासनावर गंभीर आरोप

फलटणात नुकसान भरपाईच्या बोगस याद्या; 'स्वाभिमानी'चा प्रशासनावर गंभीर आरोप
Updated on

सांगवी (जि. सातारा) : पीक नुकसान भरपाईसाठीचे पंचनामे कृषी सहायक व तलाठ्यांनी पाहणी न करताच याद्या तयार केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ज्यांचे नुकसान झाले आहे, अशांची नावे यादीत नसून ज्यांचे नुकसान झाले नाही अशांची नावे नुकसानग्रस्त यादीमध्ये आलेली आहेत. त्यामुळे कृषी सहायक, तलाठी, मंडलाधिकाऱ्यांनी संगनमताने बोगस याद्या बनवल्या असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाला आहे. तेव्हा याप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित तलाठी व कृषी सहायकांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी केली आहे. 

सोमंथळी (ता. फलटण) येथील पीक नुकसानीबाबत तलाठी आणि कृषी सहायकांनी संगनमताने पंचनामे केले आहेत. यामध्ये कित्येक लोकांचे प्रत्यक्षात कोणतेही नुकसान झालेले नसताना त्यांची नावे नुकसान भरपाईस पात्र आहेत, तर नदीकाठावर राहणाऱ्या लोकांचे नुकसान होऊनही त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे सोमंथळी येथील तलाठी व कृषी सहायकांनी पाहणी न करता बोगस नोंदी केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यात त्यांनी संबंधित तलाठी व कृषी सहायकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधितावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. फलटण तालुक्‍यात अनेक गावांत पीक नुकसान नोंदी बोगस झाल्या असून, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही नोंदी नसल्याने भरपाई मिळत नाही. "धोंड तुपाशी आणि शेतकरी उपाशी' अशी स्थिती फलटण तालुक्‍यातील पीक नुकसान नोंदीबाबत झाली आहे, असेही श्री. महामुलकर यांनी म्हटले आहे. 

पीक नुकसान यादीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे नसून तलाठी व कृषी सहायकांच्या मर्जीतील लोकांची नावे आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नव्याने यादी तयार करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.
-धनंजय महामुलकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Aditya Lalage selected for India Hockey World Cup squad
Kas Lake overflow tourist safety Satara
Nitin Gadkari Acknowledges Highway Issues; Commuters Seek Accountability
Historic Botanical Discovery: Endemic Orchid Found for the First Time in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com