तांत्रिक कामगारांचा मुंबईत धडक मोर्चा; प्रकाशगंगा मुख्यालयासमोर गुरुवारी आंदोलन

जयंत पाटील
Tuesday, 19 January 2021

न्यायालयाने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला, तरीही व्यवस्थापन अंमलबजावणी करण्यास विलंब करीत आहे.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : तांत्रिक कामगार महापारेशनच्या सुधारित स्टाफ सेटअप अंमलबजावणीच्या मागणीसाठी धडक मोर्चा मुंबईतील प्रकाशगंगा या मुख्यालयावर गुरुवारी (ता. 21) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेचे सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी ही माहिती दिली.
 
पत्रकातील माहिती अशी : महापारेषण वीज कंपनीतील तांत्रिक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांचा स्टॉप सेटअप प्रलंबित आहे. वर्ग चारमध्ये काम करणारा तंत्रज्ञ अनेक वर्ष पदोन्नती प्रक्रियेपासून लांब आहे. यावर पर्याय काढण्यासाठी 2016 मध्ये सुधारित क्‍लबिंगचा प्रस्ताव आणला गेला. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणांनी स्टॉप सेटअप अंमलबजावणीपासून दूर राहिला. डिसेंबर 2018 मध्ये अंमलबजावणी झाली. मात्र, जानेवारी 2019 मध्ये बक्षी कमिटी आणून त्यात सुधारणा करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. तीन महिन्यांत हाच सेटअप येईल अशी अपेक्षा असताना हा सुधारित सेटअप जुलै 2020 मध्ये सादर केला. त्यावर पुन्हा मत-मतांतरे झाली.

पुसेगावात महाविकास आघाडीकडून भाजप चारीमुंड्या चित; पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व
 
न्यायालयाने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला, तरीही व्यवस्थापन अंमलबजावणी करण्यास विलंब करीत आहे. म्हणून चार जानेवारीला नोटीस विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने दिली आहे. त्यासाठी गुरुवारी विविध विभागांतून धडक मोर्चा प्रकाशगंगा या महापारेषणच्या मुंबई येथील मुख्यालयावर काढण्यात येईल. त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई, उपाध्यक्ष गजानन तुपे, प्रवीण पाटील, उपसरचिटणीस नितीन पवार, उत्तम रोकडे, बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव हरीराम गीते, कोषाध्यक्ष संतोष घाडगे यांनी केले आहे. 

कोयना धरण परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांत घबराट

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Technical Workers Agitation In Mumbai On Thursday