वसंतगड ग्रामपंचायतीवर नलवडे गटाचे 'वर्चस्व'; विरोधकांवर मात करत खेचून आणली एकहाती सत्ता

वसंतगड ग्रामपंचायतीवर नलवडे गटाचे 'वर्चस्व'; विरोधकांवर मात करत खेचून आणली एकहाती सत्ता

तांबवे (जि. सातारा) : वसंतगड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर करण्याबरोबर बिनविरोध करत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आर. वाय. नलवडे यांनी एकहाती सत्ता आणली. 

वसंतगड येथील ग्रामपंचायत निवडणूक श्री. नलवडे व विरोधकांत अटीतटीची लढत होईल, अशी चर्चा होती. मात्र, विरोधी गटाकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने श्री. नलवडे यांच्या गटाने दाखल केलेले नऊ उमेदवारांचे अर्ज बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. रसाळ यांनी सांगितले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत चंद्रसेन पॅनेलला तीन जागा, तर हनुमान पॅनेलने सहा जागा जिंकत सत्तांतर केले होते. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाने अर्ज दाखल केला नाही. 

बिनविरोध उमेदवारांची नावे : अमित नलवडे, सविता गोडसे, राजश्री महाडिक, सुहास कदम, योगेश गुरव, कविता निंबाळकर, शारदा येडगे, सुरेखा पाचुकते, जालिंदर जामदार. बिनविरोध होण्यासाठी युवा नेते अमित नलवडे, सुहास गायकवाड, अमोल चव्हाण, शंकर कदम, रामचंद्र कोकरे, सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब जाधव, लक्ष्मण महाडिक, महिपती कोकरे, दिनकर शिवदास, दत्ता कोकरे, दिनकर पाटील, रवी जामदार, आनंदा येडगे, हनमंत निंबाळकर, चंद्रकांत पाटील, संतोष पाटील, अंकुश निंबाळकर, बाळू पाटील, सचिन कदम, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com