esakal
वाई (सातारा) : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार टोळीचा प्रमुख यश ऊर्फ वश्या अभिजित सोंडकर (वय १९) आणि टोळीतील सदस्य मेघराज ऊर्फ सोन्या संतोष मोरे (वय २० दोघेही रा. गंगापुरी, ता. वाई) यांना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार (Satara Crime News) करण्याचे आदेश बजावले आहेत.