धक्कादायक! महिंद धरणाच्या भिंतीजवळच भगदाड; नागरिकांसह जनावरांच्या जीवाला धोका

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : विभागातील महिंद धरणाच्या भिंतीजवळ मोठे भगदाड पडल्याने तेथून ये- जा करणाऱ्या नागरिकांसह जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे हे भगदाड निदर्शनास आले असून, पाटबंधारे विभागाने तातडीने तेथे सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

वांग नदीवरील महिंद धरणात 21 वर्षांपासून नियमितपणे पाणी अडविण्यात येत आहे. 484 मीटरच्या मातीच्या धरणाला 104 मीटरचा मुक्त पद्धतीचा सांडवा आहे. काही वर्षांपूर्वी सांडव्यालगतच्या भिंतीची पडझड झाल्याने धरणाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्याचे जॅकेटिंगद्वारे मजबुतीकरण करण्यात आले. सध्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महिंद धरणातून आवर्तने सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊन भिंतीच्या बाजूचा पाण्याखालील भाग उघडा पडत चालला आहे. 

त्यामुळेच मार्गदर्शक भिंतीजवळ पडलेले मोठे भगदाड स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. सळवे, बोरगेवाडी, माथनेवाडी या परिसरातील नागरिक, धरणात पोहायला येणारे युवक व शेतकरी धरणाच्या भिंतीजवळून ये- जा करतात. जनावरांनाही चरण्यास, तसेच पाण्यावर नेण्यासाठी तीच वाट वापरली जाते. याच वाटेवर भगदाड पडल्याने दुर्घटनेची भीती आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com