esakal | टेंभूच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम
sakal

बोलून बातमी शोधा

satara

टेंभूच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : टेंभु योजनेतील बाधीतांना तातडीने भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने सचीन नलवडे व शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार होते. त्याची दखल घेवुन पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी टेंभु योजनेच्या अधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली. त्यामध्ये टेंभु प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सैदापुर, मलकापुरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिली आहे. अन्यथा जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सचिन नलवडे यांनी आज दिला.

टेंभु प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आज शेतकरी नेते नलवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा ईशारा दिला होता. त्याची दखल घेवुन तालुका पोलिस निरीक्षक खोबरे यांनी आंदोलक व टेंभु योजनेचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांची बैठक आयोजीत केली.

हेही वाचा: OBC आरक्षणाशिवायच होणार ZP निवडणुका, तारीख जाहीर

त्यामध्ये श्री. नलवडे, शेतकरी शिवाजी पाटील, योगेश झाम्बरे, राजू पाटील, विजय पाटील, राजेंद्र पोळ, राहुल पोळ, प्रफुल्ल कांबळे आदी शेतकरी उपस्थित होते. बैठकीत सैदापुरच्या बाधित जमिनीच्या संयुक्त मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीची रक्कम वर्ग केल्याचे पत्र सादर केले असुन मलकापुर येथील शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. ते 22 सेप्टेंबरपर्यंत जिल्ह्याधिकारी कार्यालयकडे वर्ग करण्याची मुदत टेंभुच्या अधिकाऱ्यांनी मागितली. गोवारे येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रेडियार यांनी जिल्ह्याधिकारी यांना आपण पत्र दिले असून त्यामध्ये भूमि अभिलेख कार्यालयकडे जुन्या प्रस्तावात सदर क्षेत्र का आले नाही याची माहिती घ्यावी असे कळवले असल्याचे सांगितले.

श्री. नलवड़े यांनी गोवारे येथील शेतकऱ्यांची जमीन प्रत्यक्ष बाधित होत असल्याने आपल्या कार्यालयाने 2014 साली सयुंक्त मोजणी करुण मूल्यांकन प्रस्ताव जिल्ह्याधिकारी यांना सादर केला असल्याचे कागद सादर केले. 22 सेप्टेंबरपर्यंत त्यासंबधी योग्य तो निर्णय घेवून गोवारे येथील शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु करावी, अथवा धरणाचे पाणी सोडून शेतकऱ्यांची जमीन मोकळी करावी अशी मागणी केली. पंधरा दिवसांत सर्व कार्यवाही पुर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

loading image
go to top