
Latest Doctor News: पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ऑनड्युटी दारुच्या नशेत आढळला असून त्याच्यावर वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.अरुण मच्छिंद्रनाथ जाधव (वय ४७) असे डॉक्टराचे नाव आहे.
काल (बुधवार) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. संबंधित अपंग डॉक्टरला मद्यधुंद अवस्थेत पकडल्याची ही तिसरी घटना असून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या दारुड्या डॉक्टरवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.