अतिक्रमणांमुळे दीडशे एकर शेती पाण्याखाली, "या' गावात गंभीर प्रकार

Satara
Satara
Updated on

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : दुशेरे येथील कोठर ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने ओढा मुजला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबल्याने परिसरातील जवळपास 150 एकर जमिनीचे नुकसान होत आहे. शासनाने ओढ्यावरील अतिक्रमणे हटवून तो खुला करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. 

कठोर ओढा वडगाव हवेली येथील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळच्या डोंगर उतारावरून वाहत येऊन तो दुशेरेच्या शिवारातून कृष्णा नदीत जाऊन मिसळतो. विशेष म्हणजे हा ओढा मुजवून त्यावर काही शेतकऱ्यांनी शेती तयार केली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेठरे बुद्रुक ते कार्वे या महत्त्वाकांक्षी रस्त्याची निर्मिती केल्यानंतर या ओढ्यावर पूलही बांधण्यात आला. परंतु, संबंधित ठेकेदाराने गावचा नकाशा व त्यावरील ओढ्याच्या नकाशाकडे दुर्लक्ष करून जुजबीपणे ओढ्यावरील पुलामध्ये सिमेंट पाइप टाकून काम पूर्ण केले. तोच दुसऱ्या बाजूला ओढा मुजवण्याच्या प्रकारांमुळे ओढ्याच्या पूर्व बाजूच्या शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबत आहे.

पश्‍चिम बाजूच्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामात ओढा मुजवला गेल्याने पुढे प्रवाहित असणाऱ्या ओढ्याचे सपाटीकरण करून शेतजमिनी तयार केल्या आहेत. सुमारे 500 ते 700 मीटर अंतरातील ओढा मुजवून शेतजमिनी तयार केल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये या अंतराच्या पुढे कोठर ओढा पूर्ववत प्रवाहित राहिला आहे. या 500 ते 700 मीटर अंतरात अतिक्रमणांमुळे पूर्व बाजूच्या 150 एकर शेतीत पाणी तुंबून राहत आहे. दुशेरे गाव हे अल्पभूधारक क्षेत्र असणारे आहे. संपूर्ण गावास 750 ते 800 एकर शेती आहे. त्यामधील 300 एकर गाव, गावठाण, रस्ते व पाणंदीच्या वापरात आहे. उर्वरित क्षेत्रावर पिके घेतली जातात. दुर्दैवाने गेल्या दहा वर्षांपासून या क्षेत्रापैकी साधारण 150 ते 200 एकर क्षेत्रात दरवर्षी ओढ्यावरील अतिक्रमणांमुळे पाणी साचल्याने जलमय होऊन जाते. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

""रस्त्याच्या पश्‍चिमेला असणाऱ्या ठिकाणी अतिक्रमण काढून ओढा पूर्ववत करण्यास आमची कोणतीही आडकाठी नाही. प्रशासनाने गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमणे काढून ओढा खुला करावा.'' 
-संदीप जाधव, दुशेरे 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com