लोणंद-नीरा मार्गावर पाडेगावातील अपघातात साताऱ्यातील एकाचा मृत्यू

रमेश धायगुडे
Wednesday, 17 February 2021

लोणंद-नीरा रस्त्यावर पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत डंपर व टिपर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण जागीच ठार आहे.

लोणंद (जि. सातारा) : लोणंद-नीरा रस्त्यावर पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील भवानीमाता मंदिराजवळ पाडेगाव चढावर काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डंपर व टिपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर दोन जखमी झाले आहेत.
 
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, राख (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील उपेंद्र शिवकुमार गुप्ता हा डंपर (एमएच 12 एलटी 6905) घेऊन लोणंदकडून नीरा बाजूकडे जाताना पाडेगाव चढावर भरधाव वेगात चालवून नीरा बाजूकडून साताऱ्याकडे जात असलेल्या टिपरला धडक दिली. या अपघातात टिपर चालक सुनील तुकाराम पवार (वय 22, रा. इंदिरानगर, शिवराज पेट्रोलपंपासमोर सातारा) हे जागीच ठार झाले. 

उंब्रज परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ; दहशत निर्माण करत माफियांचा राजरोस उपसा

तर आकाश लक्ष्मण नलवडे (रा. इंदिरानगर, शिवराज पेट्रोलपंपासमोर सातारा) व उपेंद्र शिवकुमार गुप्ता (रा. राख, ता. पुरंदर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत लक्ष्मण बाबूराव नलवडे (रा. इंदिरानगर, शिवराज पेट्रोलपंपासमोर सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara One people dead In Padegaon Khandala Accident Satara Crime News