प्रति पंढरपूर करहरला यंदा ऑनलाइन दर्शन, आषाढीला धार्मिक विधी झाल्यावर मंदिर राहणार बंद

Satara
Satara
Updated on: 

भिलार (जि. सातारा) : कोरोनाच्या संकटामुळे यात्रांवर शासनाने अनेक निर्बंध घातल्याने यावर्षी प्रति पंढरपूर करहर येथील मंदिरात आषाढी एकादशीला फक्त धार्मिक विधी प्रथेप्रमाणे होऊन मंदिर पूर्ण बंद राहील. मात्र, भाविकांना ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

बेलोशी (ता. जावळी) येथील दत्तात्रय कळंबे महाराजांच्या समाधी स्थळावर वारकरी आणि काटवली, बेलोशी, दापवडी व खिंगर येथील पालख्यांच्या गावकाऱ्यांशी संवाद साधताना आमदार भोसले बोलत होते. या वेळी डॉ. विजय दिघे, स. म. बेलोशे (गुरुजी), तुकाराम घाटगे, शंकरराव बेलोशे, सरपंच मंदा बेलोशे, हणमंत बेलोशे, सुनील सपकाळ, भिकू बुवा शिंदे, संतोष रांजणे, भीमराव रांजणे, अशोक बेलोशे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार भोसले म्हणाले, ""कोरोनाच्या धोक्‍यामुळे मंदिरातील पारंपरिक अभिषेक व विधिवत पूजा सकाळी होणार असून, पालख्या भेटी व पादुका भेटीचा कार्यक्रम मोजक्‍याच वारकऱ्यांच्या हस्ते पार पडेल. नंतर मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांनी करहरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्याचा अट्टहास करू नये. घरीच दर्शन घ्यावे. यासाठी यू ट्यूब, फेसबुक व ऑनलाइन दर्शन देण्यासाठी यात्रा समिती व आम्ही सोय करणार आहोत. यासाठी भाविकांनी घरूनच दर्शन घ्यावे. घरीच राहा व सुरक्षित राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

तुकाराम घाडगे यांनी आषाढी वारीची परंपरा खंडित होऊ नये यासाठी यात्रा समितीने घेतलेले निर्णय योग्य असून, आम्ही वारकरी व ग्रामस्थ समितीच्या निर्णयाचा आदर करून मोजक्‍याच वारकऱ्यांनी पालख्या घेऊन सकाळी करहरला जाऊ, असे सांगितले. यावेळी डॉ. विजय दिघे यांनी वारकऱ्यांना कोरोनाला प्रतिकारक्षम अशा आर्सेनिक औषधांचे मोफत वाटप केल्याबद्दल त्यांचा आमदार भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी बबनराव शिंदे, दिनकर बेलोशे, महादेव बेलोशे, तुकाराम बेलोशे, ग्रामसेवक धनराज व्हट्टे, तलाठी धनावडे, काटवली, बेलोशी, दापवडी, रांजनी, शिंदेवाडी व रुईघर येथील वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. तुकाराम घाटगे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच मंदा बेलोशे यांनी स्वागत केले. नितीन गावडे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष रांजणे यांनी आभार मानले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli District Bank Election
Panchayat Samiti members discuss drought conditions and irrigation issues in Walwa taluka
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway
Satara Munawale Water Tourism Centre Reopens With Adventure Sports And Modern Freshwater Tourism Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com