उसावर पांढरा लोकरी माव्याचा प्रादुर्भाव, पाने काळी पडू लागली

Satara
Satara
Updated on

विंग (जि. सातारा)  : विंगसह परिसरात उसावर पांढरा लोकरी माव्याचा प्रादुर्भाव ठिकठिकाणी आढळला आहे. पानाखालचा भाग त्याने व्यापला आहे. पाने काळी पडू लागली आहेत. कीड वाढल्यास पीक नुकसानीत जाण्याची शक्‍यता आहे. 

उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव ही समस्या अलीकडे वारंवार दिसून येत आहे. पांढऱ्या रंगात ती आहे. कमी-जास्त प्रमाणात ती दृष्टीस पडते आहे. विशेषतः तुरळक पाऊस अणि ढगाळ वातावरणात ती वाढत आहे. सध्या विंगसह परिसरात ठिकठिकाणी उसावर ती दिसून आली आहे. हिरव्या पानाखालचा भाग तिने व्यापला आहे. पानेही काळी पडली आहेत. कीड पडलेल्या उसाची वाढ त्यामुळे खुंटली आहे. शेंडे करपले आहेत. कमी-जास्त प्रमाणात ती आढळून आली आहे. किडीची व्याप्ती अणखी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

2003 दरम्यान लोकरी माव्याने मोठे थैमान घातले होते. किडीची व्याप्ती राज्यभर पसरली होती. ठिकठिकाणी आख्खे शिवारच्या शिवार त्या वेळी किडीचे बळी ठरलेले होते. उत्पादकांचे मोठे नुकसान त्यात झाले होते. कीड आटोक्‍यात आणण्यासाठी संबंधित ऊस कारखान्यांनी पुढाकार त्या वेळी घेतलेला होता. सध्या विंगसह परिसरात उत्पादकाच्या उसावर कमी अधिक प्रमाणात ती आढळली आहे. कीड वाढल्यास पीक नुकसानीची भीती आहे. तत्पूर्वी नियंत्रणासाठी आवश्‍यक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. 

शेतकऱ्यांनी हे करावे... 

प्रादुर्भावग्रस्त उसाची पाने काढून ती नष्ट करावीत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार मित्र किडी आळ्या शेतात सोडव्यात. मॅलेथिऑन 50 टक्के प्रवाही कीटकनाशक हेक्‍टरी 200 मिली, 1400 मिली, 2000 मिली अनुक्रमे 400 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी घ्यावी. अथवा जमीन वाफशावर फोरेट दाणेदार कीटकनाशक हेक्‍टरी 15 किलो प्रमाणात मातीत किंवा कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावे. फवारणी शक्‍य नसल्यास मॅलेथिऑन भुकटी हेक्‍टरी 40 किलो प्रमाणात धुरळणी करावी, अशी माहिती तालुका कृषी विभागाने दिली. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com