

Satara Panchayat Election
esakal
सातारा: जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी उद्या (सोमवार) होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विजयी उमेदवारांनी सभापतिपदासाठी राजकीय भेटीगाठी घेत जोरदार लॉबिंग केले आहे. पंचायत समितींच्या निवडणुकीत ११ पैकी भाजपला केवळ तीन ठिकाणी बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि शिवसेनेला एका पंचायत समितीत थेट सत्ता मिळणार आहे. तीन पंचायत समित्यांत समान बलाबल झाल्याने सभापतिपदासाठी ईश्वरचिठ्ठी काढली जाणार आहे.