
सातारा : राज्य शासनाच्या शंभर दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे विभागांतर्गत येणाऱ्या ५३ तालुक्यांमधून सातारा पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमांतर्गत सातारा पंचायत समितीने विविध उपक्रम राबवून नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याच्या दृष्टीने काम केले. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समिती प्रथम क्रमांकावर, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचायत समितीने द्वितीय क्रमांक मिळविला.