
सातारा : सातारा शहरासह परिसरात शिवजयंतीच्या तयारीला वेग आला असून, विविध ठिकाणच्या मंडळांच्या वतीने किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यासाठीचे आराखडे तयार करण्यात येत आहेत. याच तयारीचा भाग म्हणून राजपथ सुशोभित करण्यात येत असून, त्यामुळे शिवकालाचा भास सातारकरांना होण्यास सुरुवात झाली आहे.