
कऱ्हाड : शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताला त्रास होऊ लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी काल दाखल करण्यात आले होते. आज सकाळी संबंधित संशयिताने तेथून पलायन केले. त्यामुळे पोलिस दलाची चांगलीच भंबेरी उडाली होती. मात्र, पोलिसांनी मोठी यंत्रणा राबवून संबंधित संशयितास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. संतोष यशवंत साठे (रा. म्हासोली) असे संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.