दमदार कामगिरी : 56 गुन्ह्यांतील फरार आराेपी पाेलिसांच्या पाठलागानंतर जेरबंद

दमदार कामगिरी : 56 गुन्ह्यांतील फरार आराेपी पाेलिसांच्या पाठलागानंतर जेरबंद
Updated on: 

सातारा : खटाव तालुक्‍यातील वडूज, पुसेगाव परिसरात चोरी, दरोडा व घरफोडीच्या 56 गुन्ह्यांत फरारी असलेल्या अट्टल चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नेर, फडतरवाडी (ता. खटाव) येथे ताब्यात घेतले. त्याने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत आपल्या साथीदारांसह टाकलेले दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे कबूल केले आहेत.
 
वडूज, पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील सहा महिन्यांपासून दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे प्रकार वाढले होते. यासंदर्भात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून संशयिताचा शोध सुरू केला होता. दरम्यान, दरोडे, घरफोडीतील फरारी संशयित नेर (ता. खटाव) परिसरात वावरत असल्याची माहिती श्री. पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुसेगाव, नेर, फडतरवाडी येथे सापळा रचला. मात्र, संशयित पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
 
पोलिसांनी पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने वडूज, पुसेगाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दरोडे, घरफोडी व जबरी चोरी केल्याचे कबूल केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Yashwantrao Chavan Death Anniversary CM Devendra Fadnavis Absent at Karad Memorial for Second Year in a Row
Adani Tarli Project Faces Protest Warning From Actor Sayaji Shinde Over Alleged Illegal Excavation and Environmental Violations
Sunetra Pawar and Supriya Sule Together at Preeti Sangam Their Joint Presence Sparks Political Discussions in Maharashtra
NTCA Committee to Review Sahyadri Tiger Reserve Management and Wildlife Conservation Measures in Maharashtra