पुणे, सोलापुरासह साताऱ्यात लूटमार करणाऱ्या माळशिरसच्या युवकांना अटक

पुणे, सोलापुरासह साताऱ्यात लूटमार करणाऱ्या माळशिरसच्या युवकांना अटक
Updated on

सातारा : सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांत लूटमार, जबरी चोरी, अत्याचार, दरोडा आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाठलाग करून अटक केली. पोलिस निरीक्षक सजन हंकारे, उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, हेमंत ननावरे, सागर निकम यांनी ही कारवाई केली. 
 
संदीप ऊर्फ अनिल दिलीप लवटे (वय 21, रा. मेडद, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर), अभिमान अर्जुन खिलारे (वय 23, रा. मोरुची, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले असून, पाच दुचाकी आणि दोन मोबाईल असा 94 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक वाढे फाटा परिसरात पेट्रोलिंग करत होते. या वेळी सेवा रस्त्यालगत दोन युवक दुचाकीवरून संशयितरीत्या फिरत होते. पोलिस पथक त्यांना ताब्यात घेण्यास गेले. त्यांची चाहूल लागतातच संशयित दुचाकी जागीच टाकून पळून गेले. त्यामुळे पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. 

Diwali Festival 2020 : लक्ष्मी आली नवा साज लेवून! केरसुण्यांना महिलांची पसंती

चौकशीमध्ये त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी केली. त्या वेळी त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कणसे ह्युंडाई शोरूम जवळून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी नातेपुते (ता. सोलापूर) येथे दरोड्याचा गुन्हा, दोन दुचाकी चोरी, वालचंदनगर (पुणे) येथे जबरी चोरी करून दोन मोबाईल चोरी, वारजे (पुणे) येथून दुचाकी चोरल्याचे समोर आले, तसेच अन्य ठिकाणी अत्याचाराचा गुन्हाही या दोघांवर दाखल आहे.
 
चौकशीमध्ये चोरलेल्या दुचाकीचे चेसी व इंजिन क्रमांक ते ग्राइंडरने नष्ट करत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश तात्या वाघमोडे (वय 26, रा. कातरखटाव पळसगावरोड, ता. खटाव) यालाही अटक केली आहे. संशयितांवर सातारा, सोलापूर येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक सजन हंकारे, उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, हेमंत ननावरे, सागर निकम यांनी ही कारवाई केली. 

नकली नाेटा बाजारात आणण्यापुर्वीच सातारा पाेलिसांनी उधळला डाव; तिघांना अटक 

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com