पाेलिसाचा चाणाक्षपणा; पुणे - बंगळूर महामार्गावर एकाच क्रमांकाची दाेन वाहने पकडली

पाेलिसाचा चाणाक्षपणा; पुणे - बंगळूर महामार्गावर एकाच क्रमांकाची दाेन वाहने पकडली

सातारा : क-हाड पोलिस उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे सातारा पोलिस दलातील दिपक साठे यांनी एकाच क्रमांकाच्या दाेन दुचाकी शेंद्रे गावानजीक पकडल्या आहेत.

सातारा पोलिस दलातील दिपक साठे हे कराड ते सातारा प्रवास करत असताना त्यांना एकाच नंबरच्या दोन दुचाकी दिसून आल्या. त्याच मार्गावर सूमारे 35 किलोमीटरचा प्रवास करताना शेंद्रे गावच्या हद्दीत त्या गाड्या थांबविल्या. एमएच 13 सीएन 2723 असा संबंधित वाहनांवर क्रमांक हाेता.

कडक सॅल्यूट! गावच्या भल्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाकडून लाखाचे बक्षीस जाहीर 

त्यानंतर वाहनचालकांकडे चाैकशी करुन त्यांनी संबंधित दाेन्ही वाहने तालूका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या. याबाबत अधिक तपास सुरु आहे. पोलिस दिपक साठे यांचा चाणाक्षपणाने खाेट्या नंबर प्लेट लावून फिरणा-यांची टाेळी कार्यरत आहे का याचा तपास हाेण्यास मदत हाेईल. दरम्यान एकाच क्रमांकाच्या दुचाकी नागरिकांंना आढळल्यास तातडीने पाेलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपमतलबी राजकारणाला शिरवळकरांची मोठी चपराक; राष्ट्रवादीवर आत्मपरीक्षणाची वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com