शाब्बास...पोलिसांनीच काढला शोषखड्डा!, मित्रासाठी श्रमदान

Satara
Satara
Updated on

कलेढोण (जि. सातारा) ः पोलिस दलाच्या नोकरीत तब्येत जेमतेम हवी. व्यायाम तर गरजेचाच. मात्र, लॉकडाउनमध्ये बाहेर पडून मैदानावर व्यायामाला बाहेर पडले, की नियम मोडल्याचा सर्वसामान्यांचा ठपका. त्यासाठी घरीच व्यायाम केलेला बरा; पण त्यातूनही आपल्या मित्रांच्या घरी एखादे कष्टाचे काम केले तर वाईट कुठे? अशीच कामगिरी मायणीतील पोलिस हवालदार योगेश सूर्यवंशी, होमगार्ड परशुराम हांगे आणि अमर घाडगे यांनी सहकारी मित्र संभाजीच्या शौचालय बांधकामाचा शोषखड्डा काढत मदत केली. 

सध्या लॉकडाउनच्या काळात कामगारांची वानवा आहे. अशातच मायणीत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कडक लॉकडाउन सुरू असल्याने कामगार मिळणे मुश्‍कीलच. त्यात परिस्थिती बेताची असल्याने जेसीबीच्या मदतीने शोषखड्डा काढणेही परवडणार नव्हते. त्यासाठी टिकाव, खोर, पाटी घेऊन घरच्यांच्या मदतीने शौचालय बांधणीसाठीचा शोषखड्डा काढण्याचा निर्णय मायणीतील होमगार्ड सेवेत असलेल्या संभाजी पाटोळे यांनी घेतला. मात्र, जमीन खडकाळ असल्यामुळे खड्डा लवकर निघणे शक्‍य नव्हते. मात्र, कर्तव्यावर असताना ही चर्चा आपले सहकारी पोलिस हवालदार योगेश सूर्यवशी, होमगार्ड परशुराम हांगे व अमर घाडगे यांना बोलावून दाखवली. त्यानंतर श्री. सूर्यवंशी यांनी संभाजीला ""आपणच काढू शोषखड्डा, कशाला कामगार-जेसीबी हवा. आमचा व्यायामही होऊन जाईल, असे बोलत कामास सुरुवात केली. दिवसभर चौकात वाहतूक नियंत्रणाच्या कर्तव्यात गुंतलेले श्री. सूर्यवंशी व श्री. हांगे, तर रात्रपाळीस काम करणारे श्री. घाडगे यांनी सायंकाळी आठवडाभर सायंकाळी सातच्या सुमारास संभाजीच्या घरी जाऊन कामास सुरुवात केली. सुमारे पाच बाय सात लांबी आणि आठ फूट खोलीचा शौचालयाचा शोषखड्डा काढून मित्रास केलेली मदत वाखाणण्यासारखी असून, या कामाबद्दल मायणीचे पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत शाबासकीची थाप पाठीवर टाकली. 


""एरव्ही, शौचालय म्हटलं, की किळसवाणे वाटते. मात्र, माझ्या मित्रांनी त्यासाठी शोषखड्डा काढण्यास मदत केली. ही श्रमरूपी मदत कधीही विसरू शकत नाही.'' 
- संभाजी पाटोळे, होमगार्डस मायणी 

""दररोज संध्याकाळी व्यायामासाठी लागणारा वेळ शोषखड्डा काढून मित्रास मदत केली. यातून त्याचा आर्थिक खर्चही कमी झाल्याचे समाधान वाटत आहे.'' 
- योगेश सूर्यवंशी, पोलिस, मायणी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India Vikram 1 Rocket Success Phaltan Engineer Sanket Kadam Shines in Historic Private Space Mission
Koyna River water release alert
Artificial Buffalo Milk Case Couple Arrested in Karad Following Food and Drug Administration Action
Latest Koyna Dam storage report
Marathi News Esakal
www.esakal.com