वेळमर्यादेचे उल्लंघनप्रकरणी डेहराडूनच्या दिलप्रितसिंगसह म्हसवेच्या हॉटेलचालकांवर गुन्हा

गिरीश चव्हाण
Saturday, 2 January 2021

वेळमर्यादाचे उल्लंघन करत हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी महामार्गालगतच्या हॉटेलचालकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.

सातारा : वेळमर्यादाचे उल्लंघन करत हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी महामार्गालगतच्या हॉटेलचालकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हे नोंदविण्यात आले. सातारा तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी काल रात्री महामार्गावर गस्त घालत होते. गस्तीदरम्यान त्यांना शेंद्रे (ता. सातारा) येथील हॉटेल समरथल हे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे दिसले. 

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजू बिष्णोई (वय 36, रा. शेंद्रे) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची फिर्याद हवालदार दीपक पोळ यांनी नोंदवली आहे. सातारा तालुका पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने लिंब (ता.सातारा) येथील ढाबा शेर ए पंजाब या हॉटेलवर कारवाई केली. 

फलटण तालुक्‍यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-भाजपात कांटे की टक्कर

याप्रकरणी दिलप्रितसिंग हरजितसिंग (वय 22, रा. डेहराडून, हल्ली रा. लिंब फाटा) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार हवालदार रविंद्र मोरे यांनी नोंदवली आहे. म्हसवे (ता. सातारा) येथील हॉटेल मलबार याच्यावर सुध्दा तालुका पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी मनसुर आमचुंडी गंडी (रा. म्हसवे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Police Have Registered A Case Against Three Hoteliers In Mhaswe Satara News