
सातारा : शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील ५०१ पाटी परिसरात केलेल्या कारवाईप्रकरणी समीर इन्नुस मुल्ला (रा. शनिवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ६२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.