
सातारा : वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशनतर्फे अमन (जॉर्डन) येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत १५ वर्षांखालील यश भगवान निकम आणि समृद्धी सतीश शिंदे यांनी देशाला दोन कास्य पदके पटकावून दिली. हे दोघेही जिल्हा पोलिस क्रीडा अकादमीचे खेळाडू असून, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणारे दोघेही जिल्ह्यातील पहिले खेळाडू ठरले आहेत.