महाबळेश्वर तालुक्यात 'गड आला, पण सिंह गेला'; राष्ट्रवादीला धक्का, भाजपची जोरदार मुसंडी

रविकांत बेलोशे
Tuesday, 19 January 2021

राष्ट्रवादीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सत्ताधारी गटाकडून माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र भिलारे यांचा झालेला पराभव सत्ताधारी गटाला जिव्हारी लागला आहे.

भिलार (जि. सातारा) : पुस्तकांच्या गावात सत्ताधारी गटाला धक्का देत भाजपच्या दोन उमेदवारांनी प्रवेश केला आहे. माजी सरपंच राजेंद्र भिलारे यांचा झालेला पराभव सत्ताधारी गटाच्या जिव्हारी लागला असून "गड आला पण सिंह गेला' अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा सत्ता मिळवली आहे.
 
राष्ट्रवादीच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. सत्ताधारी गटाकडून माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र भिलारे यांचा झालेला पराभव सत्ताधारी गटाला जिव्हारी लागला असून, त्यामुळे विजय झाला असला तरी त्यांचे गोटात शांतता पसरली होती. राष्ट्रवादी गटाकडून माजी सरपंच वंदना भिलारे (230), माजी उपसरपंच अनिल भिलारे (388), शिवाजी शंकर भिलारे (255), सुनीता शशिकांत भिलारे (375) यांचा विजय झाला. भाजपच्या मंगल तानाजी भिलारे (240) व वैभव बबन भिलारे (297) यांची सरशी झाली. भाजपच्या विजयी उमेदवारांनी आपला विजय गुलालाच्या उधळणीत साजरा केला. दरम्यान, पाचगणी विभागातील ग्रामपंचायतींवर बाळासाहेब भिलारे व राजेंद्र राजपुरे यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. राजपुरी ग्रामपंचायतीत भाजप तालुकाध्यक्ष मधुकर बिरामने यांना केवळ 32 मते मिळाली. यामध्ये शंकर आनंदा राजपुरे (180), प्रवीण प्रभाकर घाडगे (133), अश्विनी निलेश राजपुरे (197) हे विजयी झाले. 

Gram Panchayat Results : पवारवाडीत पवारांचा बालेकिल्ला ढासळला; 40 वर्षांनंतर सत्तांतर

दांडेघर गावात सत्तांतर झाले असून, जनार्दन कळंबे यांच्या गटाची सरशी झाली आहे. सिध्दार्थ वसंत खरात (90), सृष्टी संदेश खरात (94), सुवर्ण विजय कळंबे (199), जनार्दन महादेव कळंबे (133). गोडवली गावात स्नेहल चंद्रकांत पवार (176), अजय बबन कांबळे (105) आणि मंगेश भिकू पवार ( 108) हे विजयी झाले. आंब्रळ गावात सत्तांतर झाले असले तरी या ठिकाणी महाविकास आघाडीला यश प्राप्त झाले आहे. माधुरी गुलाब अंब्राळे ( 127), सरिता शंकर अंब्राळे (109), भानुदास एकनाथ बिरामणे (92), सारिका शंकर अंब्राळे (90), उमेश बबन जाधव (81) हे विजयी झाले. खिंगर पंचायतीत एका जागेवर झालेल्या निवडणुकीत दिनकर आनंदा मोरे (99) विजयी झाले. कासवंड ग्रामपंचायतीत रमेश तुकाराम पवार (69) निवडून आले आहेत.

तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News BJP Defeats NCP In Gram Panchayat Election Mahabaleshwar Bhilar