शरद पवारांच्या आदेशानेच सातारा-जावळीत हस्तक्षेप; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रसिंहराजेंना चोख प्रत्युत्तर

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News
Updated on

सातारा : सध्या सातारा जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठा संघर्ष पहायला मिळत असून यात आता दोन आमदारांत कलगितुरा रंगला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी, उदयनराजेंना पाडलेला माणूस, तुम्हाला संपविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आमदार शशिकांत शिंदेंना टार्गेट केले होते, त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एन्ट्री घेतल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मला विधान परिषदेची आमदारकी देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. शिवेंद्रसिंहराजे हे भाजपचे आमदार असल्याने मी जावळी तालुक्‍यात लक्ष घालून राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. पक्षाने मला सातारा-जावळीतून उभे राहावे, अशी सूचना केलेली आहे. त्यामुळे पक्ष संघटना वाढवित असताना त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतोय, असे त्यांना वाटले असेल. शिवेंद्रसिंहराजेंशी माझा वैयक्तिक वाद नाही, पण पक्ष स्तरावर आमचा वाद होऊ शकतो, असे प्रतिउत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले आहे. 

साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे काल कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे व उदयनराजेंवर भडकले. त्यांनी थेट शशिकांत शिंदेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान दिले. यावर आमदार शशिकांत शिंदेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझा आणि शिवेंद्रसिंहराजेंचा वैयक्तिक वाद नाही. पण, पक्ष स्तरावर आमचा वाद होऊ शकतो. मला विधान परिषदेची आमदारकी देताना पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्ष, संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सातारा व जावळी मतदारसंघात सध्या भाजपचा आमदार असल्याने मी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची पक्ष, संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातून त्यांच्या मनात त्यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करतोय, अशी भावना त्यांची झाली असेल. त्यातूनच त्यांनी कार्यकर्त्यांवर भडकले असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, माझी भूमिका पक्षासाठी काम करत राहणे हीच आहे, तसेच मला पक्षाकडून सातारा-जावळीतून उभे राहावे, अशी सूचना करण्यात आलेली आहे. तसेच कोरेगावातून मी दहा वर्षे आमदार झालो होतो, तेथील लोकांशी मी बांधिल आहे. या सर्व परिस्थितीत कुठेतरी माझ्या मनात भावना असेलच ना, मी माणुसकी जपणारा आणि उपकार जाणारा साधा कार्यकर्ता आहे. उद्या ते राष्ट्रवादीच्या माध्यमातून पक्षात आले तर मी त्यांचे पहिले स्वागत करेन. पण ते भाजपमध्येच असतील तर जावळी, साताऱ्यात पक्ष संघटना वाढीसाठी मला काम करावेच लागेल, असा इशाराही आमदार शिंदेंनी शिवेंद्रराजेंना दिला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एन्ट्री घेत, कोणाच्या धमकीला घाबरण्याचे काही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा वाद असाच सुरु राहणार की, यावरती कोणता तोडगा निघणार हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Board Receives Proposal to Cancel Recognition of Panchgani’s Pinewood School
Maratha Heritage Comes Alive as Satara Museum Adds New Galleries on Shivaji Era
Mahendra Crowned Hind Kesari as Pune’s Prithviraj Finishes Runner-Up
Political Buzz Intensifies in Karad as Krishna Sugar Factory Election Process Begins
Marathi News Esakal
www.esakal.com