कऱ्हाडात खुल्या प्रवर्गाचे 120 गावांत आरक्षण; शुक्रवारी होणार सरपंचपदाची सोडत!

हेमंत पवार
Wednesday, 27 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येत आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची कार्यवाही सध्या सर्वत्र सुरु आहे. तालु्क्यातील २०० ग्रापंचायतींचे आरक्षण काढण्यात येणार असून त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १२० गावे, ५४ गावे नागरिकांचा मागास प्रवर्ग, एक गाव अनुसूचित जमाती, तर २५ गावे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आज दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येत आहे. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात शुक्रवारी (ता. २९) सकाळी अकरा वाजता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील २०० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १२० गावे आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ६० गावात महिलांसाठी तर उर्वरित महिला किंवा पुरुष यांच्यासाठी आरक्षित करण्यात येतील. 

शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाला मोदी सरकारच जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांचा घणाघात

त्याचबरोबर तालुक्यातील ५४ गावे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येतील. त्यामध्ये २७ महिला आणि उर्वरित २७ ठिकाणी महिला किंवा पुरुष गावांतील जागांनुसार निवडले जातील. तालुक्यातील एक गाव अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित केले जाईल, तर २५ गावे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येतील. त्यामध्ये १३ गावात महिलांना तर उर्वरित १२ गावात महिला किंवा पुरुष गावातील जागेनुसार निवडले जातील. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता लॉटरी पध्दतीने आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे तहसीलदार वाकडे यांनी सांगितले.

भारीच! चार तासात पार केले 72 किलोमीटरचे सायकलिंग; प्राथमिक शिक्षिकेच्या तंदुरुस्तीचे सर्वत्र कौतुक

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Sarpanch Post Reservation To Be Announced On January 29 In Karad Taluka