esakal | जनता तुम्हांला माफ करणार नाही; सेना 'महाविकास'मध्येच विसरु नका
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Balasaheb Patil

जनता तुम्हांला माफ करणार नाही; सेना 'महाविकास'मध्येच विसरु नका

sakal_logo
By
शशिकांत धुमाळ

औंध (जि. सातारा) : कोरोनाने (coronavirus) हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही समाजकारणाचा घेतलेला वसा सोडणार नाही. आम्ही पाठपुरावा केलेल्या कोरोना सेंटरचे (corona center) धैर्यशील कदमांना श्रेय मिळेल, या भीतीने पुसेसावळीत कोविड सेंटरचे (pusesavali covid center) चोरीछुपे उद्‌घाटन करून कोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना (gurdian minister balasaheb patil) जनता माफ करणार नाही, असे वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (satara-political-news-shivsena-leader-dhairyasheel-kadam-criticises-gurdian-minister-balasaheb-patil-covid19-center)

ते म्हणाले, ""कऱ्हाड उत्तर मतदारसंघात आरोग्याच्या पुरेशा सुविधाअभावी जनतेची ससेहोलपट होत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी पुसेसावळी, काशीळ, उंब्रज, मसूर आदी ठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावाही केला होता. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पुसेसावळीत (कै.) डी. पी. कदम इंग्लिश मीडियम स्कूल येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तहसीलदार यांनी पाहणी करून सकारात्मकता दर्शविली होती. मात्र, प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणाऱ्या बालकबुद्धीच्या पालकमंत्र्यांना ही जागा पसंत पडली नाही. त्यांनी नागझरी रस्त्यावरील एका शाळेत कोविड सेंटरची जागा निवडली. त्यालाही आमचा आक्षेप नाही. कारण लोकांची सोय होणे आवश्‍यक आहे; परंतु काल नाकर्त्या पालकमंत्र्यांनी केवळ चार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन चोरीछुपे पुसेसावळी कोविड सेंटरचे उद्‌घाटन केले.

हेही वाचा: रुग्णांच्या नातेवाईकांना असा मिळेल पास; पाेलिसांची माहिती

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. आमचा शिवसेना पक्षही सत्तेत सहभागी आहे. सुनीता कदम या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ आपल्याला श्रेय मिळावे, यासाठी आम्हाला डावलण्याचे काम केले. मात्र, येथील जनता सुज्ञ आहे, कोणी काय केले हे लोकांना समजते.''

जिल्ह्याचे पालकमंत्री का कऱ्हाड उत्तरचे?

कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील राज्याचे सहकारमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्यावर उपाय करण्यापेक्षा सहकाराच्या नावाखाली त्यांचे जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात का, कऱ्हाड उत्तरचे? याचे कोडे जिल्ह्यातील जनतेला पडले आहे, असे कदम म्हणाले.

हेही वाचा: शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नावर उदयनराजे घेतील निर्णय ?

ब्लाॅग वाचा