रहिमतपुरात सभापती निवडी बिनविरोध; विरोधी पक्ष नेत्यांचा आक्षेप

इम्रान शेख
Thursday, 21 January 2021

रहिमतपूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध समित्यांच्या सभापतींच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.

रहिमतपूर (जि. सातारा) : येथील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आल्या. या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील उपस्थित होत्या. दरम्यान, या सभेत पालिकेच्या स्थायी समितीच्या निर्मितीवर विरोधी पक्ष नेते नीलेश माने यांनी आक्षेप घेतला. 

सर्वसाधारण सभेत लोकनियुक्त अध्यक्ष पदसिद्ध सभापती असल्यामुळे त्यांच्याकडे समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी ज्योत्स्ना जितेंद्र माने, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतिपदी विद्याधर शंकर बाजारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सुजाता तानाजी राऊत, उपसभापतिपदी पद्मा भरत घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच स्वच्छताविषयक आरोग्य समिती सभापती हे पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत, असे पीठासीन अधिकारी पाटील यांनी सांगितले. लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत केले. विद्याधर बाजारे यांनी आभार मानले. या वेळी मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, उपाध्यक्षा सुरेखा माने, विरोधी पक्ष नेते नीलेश माने, नगरसेवक बेदिल माने, चॉंदगणी आतार, रमेश माने, अनिल गायकवाड, सतीश भोसले आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

कऱ्हाडात जनशक्ती-भाजपच्या नगरसेवकांत जोरदार खडाजंगी; सभेत सूचना मांडण्यावरून गोंधळ

स्थायी समिती केवळ कागदावर : नीलेश माने 

दरम्यान, पालिकेतील स्थायी समितीच्या निर्मितीवर आक्षेप घेत ही समिती केवळ कागदावरच असते. वर्षातून एकदाही स्थायी समितीची बैठक होत नाही व कोणालाही विश्वासात न घेता कार्य केले जाते, असे मत विरोधी पक्ष नेते नीलेश माने यांनी व्यक्त केले. 

केंजळमधील दगडी खाण तहसीलदारांकडून सील; डंपर चालकाविरुध्द गुन्हा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Unopposed Selections Of Chairman In Rahimatpur Municipality