वडूज नगरपंचायतीत सभापतींच्या निवडी जाहीर

आयाज मुल्ला
Friday, 15 January 2021

अर्थ व नियोजन समिती सभापतिपदी प्रदीप खुडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सुवर्णा चव्हाण, उपसभापतिपदी सुनीता कुंभार या सदस्यांना संधी देण्यात आली.

वडूज (जि. सातारा) : नगरपंचायतीमध्ये विषय समित्यांच्या सभापती निवडी करण्यात आल्या. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठकीत या निवडी झाल्या. 

नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपाध्यक्षा किशोरी पाटील व बांधकाम समितीचे सभापती वचन शहा यांच्याकडे असणारी सभापतिपदाची जबाबदारी कायम राहिली आहे. तर अर्थ व नियोजन समिती सभापतिपदी प्रदीप खुडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सुवर्णा चव्हाण, उपसभापतिपदी सुनीता कुंभार या सदस्यांना संधी देण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे आदींनी अभिनंदन केले.

कोरेगावात जनावरांच्या दवाखान्यात डॉक्‍टर झालेत कंपाउंडर!

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Politics News Appointment Of Sunil Godse As The Chairman Of Vaduj Nagar Panchayat