
हजारमाची ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेलकडून आपापल्या फलकांवर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावून, त्यांच्या विचारांचा वारसा सांगितला जात आहे.
ओगलेवाडी (जि. सातारा) : हजारमाची ग्रामपंचायतीच्या 17 पैकी पाच जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 12 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. महिला उमेदवारांची संख्या 18 आहे. सत्तेची समीकरणे जमा होण्यास कोण बाजी मारणार? औस्तुक्याचे ठरणार आहे. या लक्षवेधी निवडणुकीतील सरळ लढतीकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीमध्ये शरद कदम, पितांबर गुरव, ऐश्वर्या वाघमारे, जगन्नाथ काळे, सोमनाथ सूर्यवंशी हे पाच जण बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 12 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या 18 आहे. पंचायतीचा कारभार लोकाभिमुख, विकासाभिमुख करण्याची ग्वाही उमेदवार देताना दिसत आहेत. निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी सदाशिवगडावरील श्री शंभू महादेवाकडे विजयासाठी साकडे घातले आहे. अधिक मतदान असलेल्या घरांना आकर्षक अशी आश्वासन दिले जात आहेत. उमेदवारांच्या प्रचारांचे फलक झळकत आहेत जणू प्रचार फलकांचे युद्ध सुरू आहे. पॅनेलकडून आपापल्या फलकांवर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावून, त्यांच्या विचारांचा वारसा सांगितला जात आहे. शेतमजूर व रोजंदारीचे काम करणारे निवडणूक प्रचारात गुंतल्याने कामे खोळंबली आहेत. प्रचारात महिलांचा सहभाग मोठा असून, हळदी-कुंकू केली जात आहेत.
उदयनराजेंची देहबोलीने कार्यकर्त्यांत मेहेरबान हाेण्याचे पसरले चैतन्य
सदाशिवगड पर्यटन केंद्र, गडावर जाण्याचा रस्ता, अत्याधुनिक ग्राम सचिवालय, आदर्श व स्वच्छ गाव, चिल्ड्रन पार्क, अतिक्रमण काढणे आदी कामे करण्याचा आव्हान नूतन पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या पुढे असणार आहे. ही कामे पूर्ण करण्याची मतदारांची अपेक्षा आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लोकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी पंकज हलकंदर व सहायक निवडणूक अधिकारी शिरसट व ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर व तलाठी मर्ढेकर निवडणूक काम पाहात आहेत.
पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने शिखर शिंगणापुरची निवडणुक रंगणार
संपादन : बाळकृष्ण मधाळे