
दोन्ही नेत्यांनी किमान नैतिकता बाळगून तरी विचार करायला हवा होता; परंतु दोघांनी चळवळीला रामराम ठोकला आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी व कार्यकर्ते यांना साथ व थारा देणार नाहीत, असा इशारा पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
कऱ्हाड (जि. सातारा) : माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत या दोघांनी कऱ्हाड व इंदापूर ऊस आंदोलनातील न्यायालयातील केसमधून स्वतःची सुटका करून घेतली. ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्रास दिला व तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतः सुटका करून घेतल्याबद्दल बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या दोघांचा जाहीर निषेध करत असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, "या दोन्ही नेत्यांनी किमान नैतिकता बाळगून तरी विचार करायला हवा होता; परंतु दोघांनी चळवळीला रामराम ठोकला आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी व कार्यकर्ते यांना साथ व थारा देणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी स्वःखर्चाने आंदोलन केली. यांना एक नोट एक वोट देऊन निवडून दिले, याची जाणीवही त्यांना राहिली नाही.''
साताऱ्यात 654 ग्रामपंचायतींसाठी 75 टक्के मतदान
आंदोलनातील हजारो शेतकरी न्यायालयाच्या चकरा आजही मारत आहेत. त्याचा कसलाही विचार न करता श्री. शेट्टी व श्री. खोत यांनी न्यायालयातून सुटका करून घेतली आहे. मी शेतकरी व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध करत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे