सातारा : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीतील मनोमिलनाचा निर्णय शिवेंद्रराजे (Shivendraraje Bhosale) यांनी घ्यावा. स्थानिक पातळीवर राजकारण नसावे, या मताचा मी असून, कुणालाही बाजूला सारून राजकारण करणे मला आवडत नाही. यामुळे आगामी काळातील निवडणुकांबाबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी कास येथे सांगितले.