सातारा : प्रदूषणाने कऱ्हाडकरांचे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

Satara : प्रदूषणाने कऱ्हाडकरांचे आरोग्य धोक्यात

कऱ्हाड : कोयनेसह कृष्णा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नद्यांच्या स्वच्छतेकडे पालिकेचे होणारे दुर्लक्षामुळे पुन्हा नद्या प्रदूषित होत आहेत. माझी वसुंधरासहित स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल राहिलेल्या कऱ्हाडच्या कोयना-कृष्णा नद्यांचे काठ अस्वच्छ होत आहेत. कोयनेसह कृष्णा नदीवर चार पूल आहेत. त्यावरून नदीत टाकल्या जाणाऱ्या निर्माल्य, प्लॅस्‍टिकसह कचऱ्यामुळेही दोन्ही नद्या प्रदूषित होत आहेत. पुलावरून नदीपात्रात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहरात स्वच्छता राखण्याबरोबरच कोयना, कृष्णा नद्या कचऱ्याने प्रदूषित होणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

माझी वसुंधरासह स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाड पालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. देशातील सर्वांत स्वच्छ शहराचाही किताबही कऱ्हाडने मिळवला आहे. ते मानांकन कायम राखण्यासाठी शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यात सेल्फी पॉइंट, कारंजे, चौक सुधार योजना, टाउनहॉलमधील रणगाडा, विमान, भिंतीचे सुशोभीकरण, रंगरंगोटीसारख्या उपक्रमांबरोबरच लोकसहभागातून स्वच्छताही पालिकेने हाती घेतली. मात्र, नागरी वस्तीत काही ठिकाणी कचरा पडताना दिसतो. पालिका तोही कचरा उचलत आहे. मात्र, अद्याप नद्यांचे काठ स्वच्छ दिसत नाहीत. कोयनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या

...अशी आहे स्थिती

  • कृष्णा नदीत सैदापूरकडून मोठ्या प्रमाणात कचरा

  • कऱ्हाडकडूनही कृष्णेत कचरा टाकण्याचे प्रमाण

  • कऱ्हाडच्या काही व्यावसायिकांचाही कचरा कृष्णाकाठी

  • वारूंजीकडूनचा कचरा कोयना पुलावरून कोयना नदीत

  • वारूंजी व सैदापूरच्या प्रवेशद्वारातच कचऱ्याचे ढीग

Web Title: Satara Pollution Threatens Health Of Karhadkars

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..