
कुरणेश्वरात गेल्या पाच वर्षांपासून वृक्ष प्रकल्प साकारण्यात आला. या ठिकाणी विविध जातींची 350 दुर्मिळ झाडे व इतर एक हजारांहून अधिक झाडांनी परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सातारा : कुरणेश्वर येथील गणपती मंदिर परिसरातील दुर्मिळ झाडांच्या प्रकल्पाला अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी नुकतीच भेट दिली. या ठिकाणी 350 हून जातींच्या झाडांचे सवर्धन केल्याने त्यांनी वृक्ष समितीचे कौतुक केले.
यावेळी अशोक गोडबोले, देवस्थानचे अध्यक्ष शंकरशास्त्री दामले, डॉ. अच्युत गोडबोले, अभय गोडबोले व वृक्ष समितीतील सदस्यांनी सयाजी शिंदे यांचा सत्कार केला. कुरणेश्वर येथे गेल्या पाच वर्षांपासून वृक्ष प्रकल्प साकारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध जातींची 350 दुर्मिळ झाडे व इतर एक हजारांहून अधिक झाडांनी परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
खुशखबर! मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या ठिकाणी विविध झाडांचे संगोपन, पर्यावरणाचे महत्त्व आदींविषयी श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी परिसरातील नक्षत्रबन व इतर भागास भेट देऊन परिसराची माहिती घेतली. यावेळी अभय फडतरे, सुनील जाधव, श्रीकांत भणगे, श्री. करंबेळकर, श्री. ताटके, श्री. खांडेकर, श्री. दीक्षित व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे