

Satara
esakal
सातारा: सततच्या पावसामुळे शहरासह विस्तारित भागातील रस्त्यांची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ये-जा करताना सातारकरांना दररोज जास्तीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारी, तसेच आगामी सणासुदीचा कालावधी लक्षात घेत पालिकेने मुरम, हॉट, तसेच कोल्ड मिक्सच्या मदतीने रस्ते दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुरमाने खड्डे बुजवण्यात येत असले, तरी हॉटमिक्सने रस्ते दुरुस्तीचा मुहूर्त पावसाच्या ताळतंत्रावर अवलंबून राहणार आहे.